लोकसत्ता टीम

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत २९ नक्षलवादी ठार झाले. यात नक्षल्यांचा कमांडर शंकरराव याचा समावेश असून ही चकमक छोटे बेठिया पोलीस ठाणे क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या कांकेर, नारायणपूर आणि गडचिरोली या नक्षल्यांच्या ‘ट्राय जंक्शन’मध्ये घडली.

Announcement of ravikant tupkar Maharashtra Krantikari Aghadi to contest 25 seats for assembly elections Pune news
रविकांत तुपकरांची ‘महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी’; विधानसभेच्या २५ जागा लढविण्याची घोषणा
वाई, कराड उत्तरेत कामाला लागा – उपमुख्यमंत्री अजित पवार; साताऱ्यात पदाधिकाऱ्यांना सूचना
Atul Benke Sharad Pawar Ajit Pawar Amol Kolhe Nationalist Congress Party
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंचं मोठं विधान
Maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule Dhule and Malegaon Assembly constituency same voter ID
दोन मतदारसंघात एकसारखेच तीन हजार मतदान कार्ड; मोठं षडयंत्र असल्याचा बावनकुळेंचा आरोप
Ajit Pawar group baramati rally empty chair
Sharad Pawar Group Post video: “सभेतल्या रिकाम्या खुर्च्या तुमचं…”, अजित पवारांच्या सभेवर शरद पवार गटाची बोचरी टीका
nana patole on congress mla cross voting
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचा दावा; नाना पटोले म्हणाले, “ज्या आमदारांनी…”
Bharat Rashtra Samithi BRS facing defections appeal high court President
भारत राष्ट्र समितीला पक्षांतरामुळे गळती; उच्च न्यायालयानंतर आता राष्ट्रपतींकडे घेणार धाव!
Sharad Pawar
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाले, “आमच्या सहकारी पक्षांना…”

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटे बेटिया पोलीस हद्दीतील जंगल परिसरात मोठी नक्षल कारवाई सुरू असल्याची गुप्त माहिती छत्तीसगड पोलिसांना १६ एप्रिल रोजी मिळाली. बीएसएफ आणि कांकेर जिल्हा राखीव गार्ड यांची संयुक्त टीम त्या परिसरात नक्षलविरोधी अभियानासाठी जात असताना दुपारी त्यांच्यावर अचानक गोळीबार सुरू झाला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २९ नक्षलवादी ठार झाले. यात नक्षलवाद्यांचा कमांडर शंकरराव हा देखील ठार झाला. तीन जवान जखमी झाले.

आणखी वाचा-यंदा प्रचारातून कृषी, रोजगार, शिक्षण, महागाई, आरोग्याचे मुद्दे गायब! प्रमुख प्रश्नांना नेत्यांची बगल…

चकमकीच्या ठिकाणाहून २९ मृतदेह सापडले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आधुनिक रायफल, सात ऐके ४७ रायफल, तीन एलएमजी जप्त करण्यात आले. चकमकीत ठार झालेला शंकर राव याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते. उर्वरित मृतदेहांची ओळख पटविण्यात येत असून यात आणखी काही मोठ्या नक्षल नेत्यांचा समावेश असू शकतो. पोलिसांनी मागील काही वर्षात केलेल्या नक्षलविरोधी कारवाईतील ही मोठी कारवाई आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले असून परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. हा परिसर गडचिरोली जिल्ह्याला लागून असल्याने चकमकीनंतर यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.