लोकसत्ता टीम

नागपूर : होळी आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपुरात गुरुवारी एका ७८ वर्षीय वृद्धेचा करोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. ही महिला मेडिकल रुग्णालयातील अतिदक्षता विभाग क्रमांक ५२ मध्ये दाखल असल्याने येथील इतर रुग्णांनाही संक्रमणाचा धोका आहे.

nagpur vote
शहरी मतदार घरी, कार्यकर्ते नाराज, परिणामी मतटक्क्य़ात घसरण
Violent Incident civil hospital thane, Patient s Relatives Attack Staff, civil Hospital Thane, Patient died at civil Hospital Thane, thane civil hospital staff and doctors protest, thane civil hospital, thane news, thane civil hospital news, thane news,
ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…

दगावलेली महिला गरोबा मैदान परिसरातील आहे. मेडिकलमध्ये आताही करोनाग्रस्तांसाठी स्वतंत्र वार्ड आहे. त्यानंतरही ही महिला अतिदक्षता विभागात दगावल्याने येथील औषधशास्त्र विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या नागपूरसह राज्यात करोनाची लाट नसल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र नागपूर शहरात प्रत्येक एक ते दोन दिवसांत रुग्णांची नोंद केली जात आहे. सद्यस्थितीत नागपुरात करोनाचे जवळपास १५ सक्रिय रुग्ण असून ते गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

आणखी वाचा- नागपुरात शिंगाड्याचे शेव खाताच मळमळ, उलट्या, पोटदुखी! झाले असे की…

दगावलेली महिला दोन दिवसांपूर्वी मेडिकल रुग्णालयात दाखल झाली होती. ह्रदयविकाराचा आजार असल्याने सुरुवातीला तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर वस्तीतील एका क्लिनिकमध्ये नेले असता, न्युमोनिया सांगण्यात आले. यामुळे मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, मेडिकल प्रशासनाने महिला करोनाने दगावल्याची माहिती महापालिकेतील आरोग्य विभागाला दिली. त्यानंतर करोना नियमानुसार महापालिकेच्या वाहनातून तिला स्मशानभूमीत नेऊन कुटुंबीयांनी निवडक लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले. सदर महिलेला करोना असल्याच्या वृत्ताला महापालिकेतील आरोग्य विभागाने दुजोरा दिला.

विदर्भात नागपूरला सर्वाधिक रुग्ण

करोनाचा नागपूरसह विदर्भात शिरकाव झाल्यापासून सर्वच लाटेत सर्वाधिक करोनाचे रुग्ण व मृत्यू नागपुरात नोंदवण्यात आले आहे. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने व देशाच्या सर्वच भागात नागपुरातून वर्दळ असल्याने ही स्थिती आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर करोनाचा या वर्षातील पहिला मृत्यू झाल्याने पुन्हा आरोग्य विभागाला धडकी भरली आहे.