नागपूर : वर्धा येथील संमेलन आटोपून दोन महिनेही व्हायचे असताना आता पुढील संमेलनाचे स्थळही ठरले आहे. ९७ वे संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे.

साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (जि. सांगली) खानदेशातील जळगाव जिल्ह्यात अमळनेर, तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील प्रस्ताव होता. यातून अखेर अमळनेरची निवड करण्यात आली.

संमेलन यशस्वी होणार

साने गुरुजींनी शाळेत शिकवत असताना “विद्यार्थी” नावाचे एक मासिक प्रकाशित केले जे विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. त्यांच्या वाङ्मयीन कर्मभूमीत हे संमेलन ५०च्या दशकानंतर पाहिल्यांदा होत आहे. अमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्य अशी मोठी परंपरा आहे. त्यामुळे साऱ्यांच्या साक्षीने व सहकार्याने अमळनेर मराठी वाङ्मय मंडळ ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी पेलायला सक्षम आहे. संमेलन नक्कीच यशवी होईल, असे अमळनेर, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.