समृद्धी महामार्गावरील अपघात नियंत्रणासाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि परिवहन खात्याची संयुक्त बैठक झाली. यावेळी या महामार्गावर पेट्रोलिंगसाठी परिवहन खात्याला १० वाहने उपलब्ध करण्यासह येथे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्याला सक्तीने ३० मिनिटे समुपदेशन सक्तीचे करण्यावर एकमत झाले.

बैठकीत प्रत्येक आरटीओकडून समृद्धी महामार्गावरील अपघाताची संभावित कारणे व उपायाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऐेकून घेतली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी केलेल्या निरीक्षणात हा महामार्ग इंडियन रोड काँग्रेसच्या निकषानुसार तयार असून त्यावर एकही ब्लॅक स्पाॅट नसल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; महिलेसह चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मानवी चुकीतूनच या भागात सर्वाधिक अपघात झाल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गाच्या धर्तीवर काही उपाय करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार अतिवेगात वाहन चालवणाऱ्यांचे सक्तीने ३० मिनिटे समुुुपदेशन केले जाईल. समुपदेशनासाठी अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले जातील. वाहनधारकाची परीक्षा घेऊन त्याला ई-शपथ देऊन त्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यानंतर पुढचा प्रवास करू शकेल. आरटीओच्या वायूवेग पथकाला पेट्रोलिंगसाठी १० नवीन वाहने दिली जातील. त्यात स्पिड गनसह इतर साधन असतील.