लोकसत्ता टीम
नागपूर: एका ६५ वर्षांचा वृद्ध शेजारी राहणाऱ्या १० वर्षीय मुलीवर बलात्कार केला. या दरम्यान शेजाऱ्याने त्याला बघितल्यामुळे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद इदरीस शेख असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
इदरीस हा घरीच सूत कातण्याचे काम करतो. त्याला मुलगा आणि सूनही आहे. त्याचा मुलगा फळ विक्रेता आहे. इदरीस मुलीच्या घराजवळच राहतो, त्यामुळे मुलगी त्याला ओळखत होती. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास इदरीस बहाण्याने मुलीला घराच्या छतावर घेऊन गेला. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असताना शेजारचा भाडेकरू घराच्या छतावर आला. त्याने हदरीसला मुलीचे शोषण करताना पाहिले. शेजाऱ्याला पाहताच इदरीसने तेथून पळ काढला.
आणखी वाचा-नागपूर: पत्नी पाठोपाठ पतीचीही आत्महत्या, मुलांवरून आई-वडिलांचे छत्र हरपले
शेजाऱ्याने घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना दिली. आईने मुलीला विचारले असता तिने इदरीसच्या कुकृत्याचा पाढा वाचला. यशोधरानगर पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी पोक्सो अॅक्टसह लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये इदरीसबाबत तीव्र रोष आहे.
