परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील आकोली या गावातील चार चिमुरडी मुलं शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाली. खूप शोधाशोध करूनही त्यांचा पत्ता न लागल्याने मध्यरात्री सेलू पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा; समाजमाध्यमांवरील संदेशाने दहशत
पोलिसांकडून शोध सुरु
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह नातेवाईकांनी सायंकाळपर्यंत सर्वत्र शोध घेतला. मात्र मागमूस लागला नव्हता. शेवटी राजेश मुंगसाजी देवडे यांनी तक्रार दाखल केली. पप्पू देवडे, संदीप बुराणे, राज राजेश येडणी, राजेंद्र राजेश येडणी, अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. यातील दोन मुलांना शनिवारी सकाळी पालकांनी शाळेत सोडलो होते. ते घरी परत न आल्याने तारांबळ उडाली. मुलं अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.