चंद्रपूर : ताडोबात कॉलरवाली वाघीण व तिच्या तीन बछड्यांनी पर्यटकांना अक्षरशः वेड लावले आहे. वाघिणीच्या या कुटुंबाच्या दर्शनाने पर्यटक सुखावले आहेत. खरंतर ताडोबा अनेक वन्यजीवांचे हक्काचे घर झाले आहे. मात्र ताडोबा ओळखला जातो येथील वाघांसाठी. येथील वाघांच्या करामतीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – गडचिरोली : ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांची ‘बॅनरबाजी’, पोलीस यंत्रणा सतर्क

हेही वाचा – “राजकारणात सर्वच असूर नसतात तर सुरेल माणसे असतात, गडकरी आणि फडणवीस दोघेही पट्टीचे कलाकार”, मुख्यमंत्री असे का म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देश-विदेशातील पर्यटक वाघांना बघण्यासाठी ताडोबात येतात. एव्हाना फार कमी पर्यटकांना वाघांचे दर्शन होतं. मात्र जुनोना-मोहुर्ली बफर क्षेत्रात पर्यटनासाठी गेलेले पर्यटक मात्र सुखावले. कारण ठरले कॉलरवाली वाघीण. या वाघिणीबरोबर तिचे तीन बछडे पर्यटकांना दिसले. येथील चालणाऱ्या या चार वाघांना आर.एस. मंगम यांनी कॅमेरात कैद केले. त्यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर हा फोटो ठेवला आहे. हा फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांत वाघांच्या मृत्यूने चिंता व्यक्त केली जात असतानाच वाघिणीचे कुटुंब सोबत दिसत असल्याने आनंद व्यक्त होत आहे.