चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील सिंधी गावात आज २४ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी वीज पडून शेतात काम करणारे ७ जण जखमी झाले. सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – ‘या’ भाजपा आमदाराला दोन वर्षे शिक्षा होऊनही सदस्यता रद्द झाली नव्हती

हेही वाचा – ‘आयपीएस’ होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने गुन्हेगारीकडे वळून बनला तोतया अधिकारी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुकर धानोरकर यांच्या शेतात शेतमालक स्वत:, त्यांची पत्नी व इतर १५ मजूर काम करित होते. याचवेळी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट सुरू झाला. अचानक वीज कोसळून मधुकर धानोरकर, उषा सुरेश चौधरी, किरण पुरुषोत्तम चौधरी, माधुरी भास्कर मोरे, मंदाबाई मधुकर धानोरकर, मृनाल शेषराव बोबडे, अर्चना सुनिल चौधरी जखमी झाले. यापैकी मधुकर धानोरकर व उषा चौधरी गंभीर जखमी आहेत. माहिती मिळताच ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी सभापती आबाजी पाटील ढुमणे, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, भास्कर मोरे, भैय्या मोरे, सुरेश ढुमणे, इर्शाद शेख, तलाठी शेंडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.