गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या एक आठवड्यापासून रानटी हत्तींचा कळप धुमाकूळ घालत आहे. आज, मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिडका/येरंडी येथील एका शेतकऱ्याचा हत्तींच्या कळपाने बळी घेतला, तर एक जण जखमी झाला. सुरेंद्र कळहीबाग (४२, रा. मु. तिडका /पौनी ता.अर्जुनी मोरगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा- उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ९४ गावात लंम्पीचा प्रसार; ५४४ जनावरे बाधित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळहीबाग शेतात जागली करीत असताना हत्तींचा कळप त्यांच्या शेतात शिरला. हत्तींचा कळप पिकांची नासधूस करीत असल्याचे पाहून त्यांनी हत्तींना हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात हत्तींनी चिरडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर एक शेतकरी जखमी झाला, अशी माहिती नवेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोशन दोनोडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या घटनेमुळे तालुक्यात रानटी हत्तींची दहशत पसरली आहे.