scorecardresearch

अकोला : उच्चशिक्षित विवाहितेने अभियंता पतीला सोडून धरला प्रियकराचा हात; १४ महिन्यांच्या चिमुकलीचाही केला नाही विचार

उच्चशिक्षित विवाहितेने प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी पुण्यातील अभियंता पती, १४ महिन्यांची मुलगी आणि समाज, कुटुंबाचादेखील विचार केला नाही.

married women run away with boyfriend
उच्चशिक्षित विवाहितेने अभियंता पतीला सोडून धरला प्रियकराचा हात (image – representational/pixabay)

अकोला : प्रेमात पडले की प्रेमीयुगुल प्रेमासाठी सर्व काही विसरून जातात. असाच एक प्रकार अकोला जिल्ह्यात उघडकीस आला. उच्चशिक्षित विवाहितेने प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी पुण्यातील अभियंता पती, १४ महिन्यांची मुलगी आणि समाज, कुटुंबाचादेखील विचार केला नाही. मुलीला घेऊन विवाहिता प्रियकरासोबत १५ दिवसांपूर्वी पळून गेली. पोलिसांनी पकडून आणल्यावर विवाहित प्रियसीने प्रियकरासोबतच जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला धक्काच बसला.

हेही वाचा – वाशीम : जुन्या पेन्शनचे टेन्शन! दुसऱ्या दिवशीही संपाची झळ; आरोग्यसेवा सलाईनवर

हेही वाचा – जुन्या पेन्शनच्या मागणीला सहाशे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा पाठिंबा; काळ्या फिती लावून काम

जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील एका अभियंता मुलाचा तेल्हारा तालुक्यातील एका उच्चशिक्षित मुलीशी अडीच वर्षांपूर्वी विवाह झाला. नवरा मुलगा पुण्यात नोकरी करतो. त्यांना एक १४ महिन्यांची मुलगीदेखील आहे. विवाहितेचे लग्नाच्या आधीचे प्रेम प्रकरण होते. ते प्रेम पुन्हा बहरले. विवाहितेने १४ महिन्यांच्या मुलीला घेऊन प्रियकरासोबत १५ दिवसांपूर्वीच पलायन केले. पतीसह कुटुंबीयांनी शोध सुरू केल्यावर विवाहिता तिच्या प्रियकरासोबत असल्याचे समोर आले. पुणे पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी अकोल्यातूनच विवाहिता व प्रियकराला ताब्यात घेतले. विवाहितेची विचारपूस करण्यात आली असता तिने प्रियकरासोबत जाणार असल्याचे सांगितले. विवाहितेच्या आईने आपल्या जावयासच पाठिंबा दिला. मुलीचे कृत्य पाहून आईचे डोळे पाणावले होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 15:33 IST