वर्धा: दारूबंदी असलेल्या गांधी जिल्ह्यात दारूचा वाहणारा महापूर नवा नाहीच. वाट्टेल त्या मार्गाने येणारी दारु पोलीसांसाठी नेहमीच मनस्ताप ठरते. आता तर रेल्वे पोलीसांनाही दारु पकडण्याची कामगिरी पार पाडावी लागत आहे.

स्थानकावरील आरपीएफ जवानांना गाडीतून विदेशी दारु आणली जात असल्याची सुगसुगी लागली होती. त्यांनी हिमसागर येताच तपासणी सुरू केली. सेवाग्राम स्थानकावर एका कोच मध्ये त्यांना एक बॅग आढळून आली. त्यात तब्बल ४० हजार रुपये किमतीचा दारु साठा सापडला.

हेही वाचा… ‘आर्थिक साहाय्य योजने’कडे ‘महाज्योती’चे दुर्लक्ष; शेकडो विद्यार्थी लाभापासून वंचित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॅग गाडीत बेवारस टाकून द्यायची व इच्छित स्थळी त्याची उचल करायची, असा डाव रचला जात असल्याची शंका व्यक्त होते. या पूर्वी पण असा साठा जप्त करण्यात आला आहे. ऑपरेशन सतर्क अंतर्गत ही कारवाई झाली. हा जप्त दारु साठा उत्पादन शुल्क विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.