नागपूर : प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीला प्रियकराने देवदर्शनाला नेत असल्याचे सांगून जंगलात नेऊन बलात्कार केला. याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ओमप्रकाश अरुण कुदावळे (२५, रा. कोराडी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय तरुणी कुदावळे वारंवार संपर्कात आल्याने त्याच्या प्रेमात पडली. ओमप्रकाशनेही तिला प्रेमास होकार दिला. तरुणीने त्याला लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्याने कामधंदा केल्यानंतर लग्नाचा विचार करेल, तोपर्यंत थांबण्यास सांगितले.

हेही वाचा – धक्कादायक! ‘एटीएम’ फोडण्यासाठी दरोडेखोर विमानाने यायचे नागपुरात

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तिने ओमची कुटुंबीयांशी ओळख करून दिली आणि त्याच्याशी लग्न करणार असल्याचा निर्णय सांगितला. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या लग्नाबाबत विचार केला नाही. तरुणीला देवदर्शन करायला घेऊन जातो, असे सांगून तो दुचाकीने तिला जंगलात घेऊन गेला. जंगलात गाडी थांबवून तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने लग्न करण्यास नकार देण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईलाजाने तिने त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हेही वाचा – नागपूर: आराखडा तयार नसताना नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी? अजित पवार यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसानंतर तो तिच्या घरी आला. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तो वारंवार तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिचे लैंगिक शोषण करायला लागला. २९ मार्चला त्याने तिला घरी नेले आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने लग्नाचा विषय काढला असता तिला मारहाण केली आणि लग्न करण्यास नकार दिला. तरुणीने कोराडी पोलीस ठाणे गाठले आणि प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकर ओमप्रकाश कुदावळेला अटक केली.