यवतमाळ: पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना पुसद येथील आदर्शनगरात घडली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

शोहेब सलीम निर्बान (१९, रा. आदर्शनग, पुसद), असे गुन्हा नोंद झालेल्या युवकाचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी ही इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. तिची वर्षभरापूर्वी शोहेब याच्याशी ओळख झाली होती. त्यामुळे ती युवकाच्या घरीदेखील जात होती. त्याच्या आईने एक दिवस पैसे मागितले असता, मुलीने पाचशे रुपये दिले होते. पाच महिन्यापूर्वी युवकाला पैसाचे काम असल्याने त्याला अंगठी दिली होती. त्यानंतर त्याला अंगठी मागण्याचा प्रयत्न केल्यास टाळाटाळ करीत होता. माझ्याकडे फोटो असून, ते इंस्टाग्रामवर टाकण्याची धमकी देत होता.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
nashik, police, complainants
नाशिक : जप्त एक कोटीचा मुद्देमाल पोलिसांकडून तक्रारदारांना परत
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल

हेही वाचा… यवतमाळ: पर्यटन मंत्रालयाच्या योजनांचे आमिष; फसवणुकीचा आकडा सव्वा कोटींच्या घरात

दोन दिवसापूर्वी शोहेब हा मुलीच्या शाळेजवळ आला. माझ्याकडे अंगठी नाही. मात्र, पैसे देतो असे म्हणून त्याने घरी बोलावले. मंगळवारी दुपारी चार ते पाच वाजता दरम्यान मुलगी घरी गेली असता, त्याने पैसे शोधण्याचा बहाणा केला. पैसे आई घेवून गेली असेल, असे म्हणत विनयभंग केला. मुलगी जोरात ओरडल्याने काही अनोळखी मुले तिथे आली. त्यामुळे सुटका करून पीडित आपल्या घरी परतली. ही घटना तिने पालकांना सांगितली. याप्रकरणी पीडितने वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शोहेब निर्बान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.