लोकसत्ता टीम

वाशिम: रस्त्याच्या कामावर लाखो रुपये खर्च होतात. तरीही शहरातील रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडतात कसे? लाखो रुपयांचा निधी जातो कुठे? असा आरोप करून स्वराज्य संघटनेकडून शहरातील अकोला नाका रस्त्यावरील खड्यात बेशरमीचे फुल वाहून खड्ड्यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला. या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा आहे.

वाशिम शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. मात्र, शहरातील रस्ते गाव खेड्यातील रस्त्या पेक्षाही दयनीय स्थितीत आहेत. रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून देखील शहरातील रस्ते नादुरुस्त आहेत. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील डांबर अदृश्य झाले असून मोठं मोठे खड्डे पडले आहेत.

हेही वाचा… व्‍याजासह कर्जाची रक्‍कम परत केल्‍यावरही सावकार महिलेकडून छळ… अखेर आयुष्यच संपवले!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे दररोज किरकोळ अपघात होत असून अनेकांना विविध आजाराचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करीत स्वराज्य संघटनेकडून शहरातील अकोला नाका रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात बेशरमीचे फुल वाहून, चक्क केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी स्वराज्य संघटनेचे अरविंद पाटील अहिरे, उद्धवराव ढेकळे, स्वप्निल वाघ, निलेश गावंडे, गजानन वानखेडे, गणेश वायचाळ, गोपाल काळे, वाळके पैलवान, योगेश गावंडे आदींची उपस्थिती होती.