scorecardresearch

Premium

वर्धा : निर्माल्याचे पावित्र्य जपावे म्हणून स्वतंत्र निर्माल्य वाहन, शिवमंदिर भगिनी मंडळाचा पुढाकार

सणासुदीच्या दिवसात हार, दुर्वा, फुले, बेल व देवास अर्पण अन्य वस्तू कचरा ठरू नये म्हणून येथील शिवमंदिर भगिनी मंडळाने पुढाकार घेतला.

Nirmalya vehicle Wardha
वर्धा : निर्माल्याचे पावित्र्य जपावे म्हणून स्वतंत्र निर्माल्य वाहन, शिवमंदिर भगिनी मंडळाचा पुढाकार (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

वर्धा : सणासुदीच्या दिवसात हार, दुर्वा, फुले, बेल व देवास अर्पण अन्य वस्तू कचरा ठरू नये म्हणून येथील शिवमंदिर भगिनी मंडळाने पुढाकार घेतला. हे निर्माल्य वहन करीत त्याची योग्य विल्हेवाट लागावी असा हेतू होता. तसे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आल्यावर तत्पर प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा – हवामान खात्याचे अंदाज का चुकतात? अत्याधुनिक यंत्रणा असूनही उपयोग…

congress wave in maharashtra, nana patole congress wave in maharashtra
महाराष्ट्रात काँग्रेसची लाट – नाना पटोले
international space station akola, international space station amravati, international space station washim
‘या’ चार जिल्ह्यांत आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राचा थरार, उल्का वर्षाची पर्वणी; जाणून घ्या कुठे, केव्हा…
52 students cracked sti exam, psi exam, aso exam, mahajyoti orgnization mpsc result
‘एमपीएससी’ : ‘महाज्योती’चे ५२ विद्यार्थी उत्तीर्ण; कर सहायक, पीएसआय, एएसओ पदावर होणार रुजू
maharashtra district court recruitment 2023, district court recruitment, recruitment for 4629 posts
जिल्हा न्यायालयांत ४६२९ पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

हेही वाचा – नागपुरातील पुरात दहा हजार घरांचे नुकसान, फडणवीसांचा दौरा, मदतीचे आश्वासन

पालिकेने आजपासून पुढे गणपती विसर्जनपर्यंत स्वतंत्र गाडीची सोय केली आहे. शहरातील सर्व मंदिरे, प्रमुख चौक या ठिकाणांहून निर्माल्य गोळा केल्या जाणार आहे. शिव मंदिरातून सुरवात झालेली आहे. यामुळे निर्माल्याचा अपमान न होता त्याचे पावित्र्य राखल्या जाईल, अशी भावना यासाठी पुढाकार घेणाऱ्या रंजना सुरेश पट्टेवार तसेच सविता श्याम वैद्य, सुनंदा लाखे, शकुन नीमजे, शारदा दाते यांनी व्यक्त केली. मनीषा बंडोपिया, मंदिराचे चंद्रकांत मुडे, किशोर लाखे, उमेश नागपूरकर आदींनी पालिका प्रशासक राजेश भगत तसेच भाग्यश्री बोरकर, विशाल सोमवंशी यांचे आभार मानले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A separate nirmalya vehicle to preserve the sanctity of nirmalya initiative of shiv mandir bhagini mandal in wardha pmd 64 ssb

First published on: 24-09-2023 at 14:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×