केंद्र सरकारच्या सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत ११ नोव्हेंबर रोजी शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या किंग्सवे शाखेत सकाळी १० वाजल्यापासून आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा- नागपूर: डाव्या ‘अभाविप’विरुद्ध अनेक उजव्या संघटना मैदानात!

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय कार्मिक खात्याचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी स्मार्टफोनद्वारे जीवन प्रमाणपत्र देणारी ‘फेस ऑथेंटिकेशन प्रणालीचे लोकार्पण केले होते. सर्व निवृत्तीवेतन धारकांना ‘डिजिटल लाईफ सर्टिफिकेट’ देण्याचे निर्देश दिले होते. याच अनुषंगाने हा उपक्रम केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राबवला जात आहे. यापूर्वी जीवन प्रमाणपत्र भौतिक स्वरूपात सादर करावे लागत होते आणि त्यासाठी वृद्ध पेन्शनधारकांना कित्येक तास बँकेबाहेर रांगेत उभे राहावे लागत होते. आता एका क्लिकवर ते मिळणार आहे. मोबाईलद्वारे ‘फेस ऑथेंटिकेशन’द्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाईल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक/पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक यासंबंधीचे तपशील आवश्यक आहे.

हेही वाचा- नागपूर: चार्जिंग स्टेशनच्या जागेसाठी एकही प्रस्ताव नाही, महापालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही सुविधा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरूपात वितरण अधिकाऱ्यांमार्फत देखील उपलब्ध आहे. केंद्र शासनाने सर्व निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल मोडद्वारे सादर करण्यासाठी संबंधित केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले आहे.