नागपूर : आई व दोन मुलांसह दुचाकीने जाणाऱ्या युवकाला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात चालक युवक, त्याची आई, मुलगी ठार झाली तर पाच वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला. हा अपघात शनिवारी सकाळी रामटेकजवळील आमडी खिरी रस्त्यावर घडला. विक्की हरगोविंद बावणे (रा. बालाघाट), आई भगवंताबाई हरगोविंद बावणे आणि मुलगी इशानी (८) अशी मृतांची नावे असून मुलगा युग याच्यावर सावनेरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की बावणे हे मूळचे बालाघाट मध्यप्रदेशातील रहिवासी असून कामाच्या शोधात नागपुरात आले होते. विक्की हा बांधकाम मिस्त्री असून तो आई भगवंताबाई, ५ वर्षांचा मुलगा युग आणि ८ वर्षांची मुलगी ईशानी यांच्यासह राहतो. कुटुंबात लग्नसोहळा असल्यामुळे विक्की हा आई भगवंताबाई व दोन्ही मुलांसह दुचाकीने बालाघाटला जात होते. आज शनिवारी सकाळी अकरा वाजता आमडी गावाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत विक्की, भगवंताबाई आणि मुलगी ईशानी यांचा मृत्यू झाला. तर मुलगा युगवर उपचार सुरू आहे.

हेही वाचा – नागपूर : इंस्टाग्रामच्या नादात विद्यार्थिनीची आत्महत्या; चौथ्या माळ्यावरून घेतली उडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघात होताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळावर बोलावण्यात आले. या प्रकरणात रामटेकचे ठाणेदार हृदयनारायण यादव हे अपघाताची माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते, हे विशेष.