नागपूर: कामठीतील वैष्णवदेवीनगर परिसरात घराजवळ खेळताना एका १० वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकले. केसासकट त्वचा निघाल्याने गंभीर जखमी झालेल्या मुलीला कुटुंबीयांनी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मुलीची स्थिती बघता लवकरच रात्री तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

बबिता (बदललेले नाव) ही मुलगी मंगळवारी दुपारी घराजवळ खेळत होती. तिच्या बाजूलाच एक जनरेटर सुरू होते. खेळताना मुलगी अचानक जनरेटरच्या बाजूला पडली. जनरेटरच्या पट्ट्यामध्ये केस अडकले. त्यामुळे ती जनरेटरमध्ये ओढली गेली. मुलगी किंचाळल्याने तत्काळ जनरेटर बंद केले गेले. मात्र, तोपर्यंत केसांसहित संपूर्ण त्वचा निघाली. रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलीला मेडिकलमध्ये हलवण्यात आले.

हेही वाचा… दिवाळीत चंद्रपूरच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तातडीने प्लास्टिक सर्जरी विभागाला सूचना देत रुग्ण त्यांच्याकडे हस्तांतरित केला गेला. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी झटपट तिला शस्त्रक्रिया गृहात हलवले गेले. या विषयावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, मुलीवर त्वरित उपचार सुरू केले असून तिची प्रकृती स्थिर आहे. मुलीबाबत प्लास्टिक सर्जनकडे कॉल पाठवला असून लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया होईल.