नागपूर : ‘साशा’, ‘उदय’ आणि ‘दक्षा’ यांच्यानंतर मंगळवारी अवघ्या दोन महिन्याच्या बछड्यानेही जीव गमावला. कुनो राष्ट्रीय उद्यानात दोन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या चित्त्याच्या चार बछड्यांपैकी तो एक होता. अवघ्या दोन महिन्यात चार चित्ते कुनोने गमावले आहेत.
नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून २० चित्ते भारतात स्थलांतरित करण्यात आले होते. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात यातील एका मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला. तत्पूर्वी भारताने ‘साशा’ या मादी चित्त्याला गमावले होते. चित्त्यांवर निरीक्षण करणाऱ्या चमुला चार शावकांपैकी तीन बछडे मादी चित्ता ‘ज्वाला’ सोबत फिरताना आढळले.
हेही वाचा >>>चंद्रपूर: रावत गोळीबार प्रकरणाचा उलगडा; काँग्रेस समर्थित दोन भावंडांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
तर एक बछडा एकाच ठिकाणी पडून होता. निरीक्षण चमुने पशुवैद्यकांना बोलावले आणि बछड्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. अशक्तपणामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असे कुनो प्रशासनाचे म्हणणे आहे.
सप्टेंबर २०२२ मध्ये ‘ज्वाला’ला नामिबियाहून आणले होते. तर मार्च २०२३च्या अखेरीस तिने चार बछड्यांना जन्म दिला.