नागपूर: आठवडी बाजारात आलेल्या भाजी विक्रेत्याने तब्बल ३१ दुचाकी चोरी करून मध्यप्रदेशात वाहनांची कवडीमोल भावाने विक्री केली. वाडी पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करून टोळीच्या मुसक्या आवळल्या. शैलेंद्र नायक , राजेश भलावी आणि मनेश उर्फ बंटी बिसेन सर्व रा. शिवनी, मध्यप्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ३१ वाहन जप्त करण्यात आले. चोरीच्या वाहनात एका चारचाकीचा समावेश आहे. यातील मुख्य आरोपी शैलेंद्र हा विवाहित असून भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. त्यानिमीत्त तो वाडी परिसरातील आठवडी बाजारता येत असे.

इकडे वाहन चोरीच्या तक्रारी वाढल्याने वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करण्यात आले. पथकातील पोलिस आठवडी बाजारात लक्ष ठेवले. शैलेंद्र त्याच्या साथीदाराच्या मदतीने वाहन चोरी करून शिवनीत त्याची विक्री करीत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक शिवनीच्या मानेगावात पोहोचले. सापळा रचून शैलेंद्रला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या दोन्ही साथीदारांना पकडले. सखोल चौकशी दरम्यान त्यांनी ३१ दुचाकी आणि एक चारचाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिली. सर्व वाहन जप्त करून आरोपींना अटक करण्यात आले. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा… मोलकरीणने बघितला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, भाजपा नेत्या सना खान हत्याकांड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार, विनोद गोडबोले, उपनिरीक्षक गणेश मुंढे, प्रमोद गिरी, प्रवीण फलके, प्रमोद सोनोने, सतीश येसनकर, हेमराज बेराळ यांनी केली.