नागपूर : दोन दिवसांनी तान्हा पोळा असताना बाजारात वेगवेगळ्या आकाराचे लाकडी बैल विक्रीला आहे. यवतमाळ येथील एका कलाकाराने तान्हा पोळ्यासाठी मोठा लाकडाचा नंदी बैल तयार केला आहे. या नंदीबैलाची किंमत दीड लाख रुपये असून तो नागपुरात महाल भागात विक्रीला ठेवण्यात आला आहे.  

यामध्ये एकाच लाकडावर कोरकाम करण्यात आले असून सुबक असा सहा फुटाचा नंदीबैल बनविण्यात आला. कलाकाराने याच्यावर मोठ्या प्रमाणात कलाकारी केली. अगदी हुबेहूब वाटावा असा हा साडेसहा फूट उंचीचा नंदीबैल आहे. पोळ्याच्या दिवशी पोळ्यात आकर्षणाच केंद्र ठरणार आहे. उद्या बैलांचा पोळा तर परवा तान्हा पोळा आहे. तान्ह्या पोळ्यात बच्चेकंपनी नंदीबैल घेऊन जातात. विदर्भात लाकडाच्या बैलांचा पोळा म्हणजेच तान्हा पोळ्याला मोठे महत्त्व असते. त्यामध्ये लहान मुले आपला नंदीबैल घेऊन तान्हा पोळ्यात दाखल होतात. बक्षीसही मिळवतात. त्यांच्यासाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. मात्र हा नंदीबैल यावर्षीचा आकर्षण ठरेल, असे पाहायला मिळत आहे. त्याची फिनिशिंग सुद्धा कलाकाराने सुबक केली आहे.

हेही वाचा >>>विला ५५ कॅफेत हुक्क्याचा धूर, नागपूरच्या गोकुळपेठेतील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे त्याची मागणी सुद्धा वाढायला लागली. जीवंत बैलाच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने याची किंमत जास्त आहे. मात्र हा बैल इतका आकर्षक आहे की तो सगळ्यांचे मन मोहून घेत आहे. हा बैल नेमका कशाप्रकारे बनविला ते कारागीर फरान शेख यांनी हा बैल तयार करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला आहे. एका सलग लाकडापासून हा नंदीबैल बनविण्यात आला असून त्याला लाकडाचे पॉलिश लावण्यात आल्यामुळे चकाकी आली आहे.गेल्यावर्षी साडेतीन लाखाचा बैल तयार करण्यात आला असल्याचे त्याने सांगितले.