लोकसत्ता टीम

नागपूर : अपहृत विद्यार्थीनीचा आरपीएफच्या पथकाने शोध घेतला. चाईल्ड लाईनच्या मदतीने तिला छत्तीसगढ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरपीएफच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगी सुखरुप आहे.

Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

छत्तीसगढच्या बलरामपूर जिल्ह्यातील संजना (काल्पनिक नाव) दहाव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. दुपारच्या सुमारास ती आजोबासोबत बाजारात सामान खरेदीसाठी गेली होती. दरम्यान आजोबा सलूनच्या दुकानात गेले तर संजना सामान खरेदीसाठी बाजारात होती. दरम्यान लाल रंगाच्या कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी तिला बळजबरीने कारमध्ये बसविले आणि घेऊन गेले. गुंगीचे औषधी दिल्याने तिची शुध्द हरपली होती. दरम्यान नरसिंहपूर जवळ ती शुध्दीत आली. नरसिंहपूर रेल्वे स्थानकाहून ती अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटली. मिळेल त्या गाडीने ती निघाली आणि नागपुरात पोहोचली.

आणखी वाचा-अनैतिक संबंधातून विनय पुणेकरचा खून; प्रेयसी साक्षी गोव्हरला अटक, प्रियकर फरार

तिकडे संजना दिसत नसल्याने कुटुंबियांनी नरसिंहपूर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली. पोलिसांनी शोध घेतला तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे तिचे लोकेशन नागपूर रेल्वे स्थानक मिळाले. या बाबत आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त यांना कळविण्यात आले. पोलिसांच्या मोबाईलवर संजनाचे छायाचित्र पाठविले. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर छायाचित्र पाठवून शोध घेण्यास सांगितले.

दरम्यान शोध सुरू असतानाच ती प्लेटफार्म नंबर ८ वर भयभीत अवस्थेत मिळाली. आस्थेने विचारपूस करून तिला ठाण्यात आणले. उपनिरीक्षक प्रियंका सिंह यांनी चाईल्ड लाईन प्रतिनिधीच्या उपस्थितीत तिची विचारपूस करून वरिष्ठांना माहिती दिली. चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी संजनाला संबिधीत पोलिसांच्या स्वाधीन केले.