नागपूर: विदर्भासाठी वरदान ठरलेल्या समृद्धी महामार्गावर अपघात कमी झाले आहेत, पूर्णपणे पण थांबले नाही. यामुळे समृद्धीवरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. प्रत्यक्षात अपघाताचे कारण शोधले तर ते वेगवेगळे आहेत व त्यावर उपाय व जागरुता पण झाली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले पण थांबले नाही.

समृध्दी महामार्गावर काही प्रमाणात मोठ-मोठे होर्डिंग लावले. रस्ताच्यामध्ये काही आकर्षक वस्तू पण लावल्या आहे. त्यामुळे वाहन चालकाला या सर्व गोष्टींमुळे संमोहन होणे थांबते. समृध्दीवर अपघात होण्याची दोन मुख्य कारणे लक्षात आली होती. ती म्हणजे वाहन चालकाचे काही अंतर चालल्यावर संमोहन व सिमेंटच्या मार्गावर वाहनाचे चाके चाललात त्यामुळे ते उष्णतेने भ्रष्ट होणे. आता वाहन चालक काही अंतर चालल्यावर कुठे तरी थांबतो, पेट्रोल भरतो, चहा पितो त्यामुळे संमोहन जाणवत नाही.

शिवाय काही वेळ थांबल्यावर चाके पण थंड होतात. दिवसा समृध्दीचा प्रवास केला की अपघात कमी व्हायला लागले. समृध्दी महामार्गावरुन रात्रीचा प्रवास करीत असताना काही मार्गावर ७५ ते १०० किलोमीटर पर्वत विद्युत दिवे नाही. त्यामुळे रस्त्यावर अंधार असतो. वाहन चालक वाहनाच्या दिव्यावर वाहन चालवतो तेव्हा आजूबाजूला असलेले होर्डिंग, रस्त्याच्या मधोमध असलेल्या आकर्षित मोठ्या वस्तू दिसत नाही. एकदम जवळ आल्यावर दिसतात, त्यामुळे वाहन चालक विचलीत होत नाही. त्यामुळे संमोहित होण्याचे प्रमाण वाढलेले दिसतात, त्यातच त्याला झोप येते व हेच कारण अपघात होण्याचे ठरतात.

त्यामुळे रात्रीच्या वेळेवर समृद्धी महामार्गावर काही उपाययोजना करून रस्त्यावर संमोहन टाळण्यासाठी उपाय करण्याची गरज आहे . याच परिस्थितीला लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांनी एमएससी भौतिकशास्त्राची विद्यार्थिनी खुशबू सिंग व एमबीएची विद्यार्थिनी नमीका शेख सोबत एक प्रकाशित मॉडेलची कल्पना केली व त्याला ‘लूम अलर्ट’ असे नाव दिले. यामध्ये पेट्रोल पंपापासून ५० किलोमिटरवर एक गेट दिला व त्यावर एलएडी लाईटचा एका बाजूला मोर तर दुसऱ्या बाजूला एलएडीचा गुच्छ ठेवण्यात आला व मध्ये एलएडीचे प्लास्टिक खाली दिवे देऊन प्रकाशमय गेट बनवण्याची कल्पना दिली.

एवढेच नव्हे तर गेटच्या अगोदर प्रत्येक १० मिटरवर लाल,‌ निळे व हिरव्या रंगाची एलएडीचे झाडे या दोन्ही बाजूंनी लावण्यात आली. या प्रकाशमय योजनेला ‘लुम अलर्ट’ असे नाव देऊन जेव्हा वाहन चालक लांबून येथे येईल तेव्हा तो विचलित होईल व या प्रकाशमय दारातून जाईल त्याच वेळेस दुसऱ्या येणाऱ्या मार्गावर सुद्धा असाच प्रकाशमय द्वार राहील. त्यामुळे दोन-पाच किलोमीटर पर्यंत संपूर्ण प्रकाशमय वातावरणातून वाहन चालक जाईल व तो झोपेपासून मुक्त होईल. अशीच व्यवस्था प्रत्येक १०० किलोमिटर मार्गाच्या दोन्ही बाजूला करण्यात यावी असा आग्रह डॉ. संजय ढोबळे व त्यांच्या संशोधक चमूतील खुशबू सिंग व नमीका शेख यांनी धरला. यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात बराच काळ चालल्यानंतर संमोहनाचा त्रास होणार नाही. त्यामुळे अपघात नक्की थांबेल अशी अपेक्षा या संशोधक चमूला वाटते.

नुकताच एक रात्री ७ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात वाहन चालकाला झोपेची डुलकी लागली व त्यामुळे उमरेड मधील एकाच कुटुंबातील चार व्यक्ती ठार झाले. या अपघाताची कारणे शोधताना डॉ. संजय जानराव ढोबळे यांना “लूम अलर्ट” ची कल्पना आली व त्यांनी आपल्या संशोधक चमूतील खुशबू सिंग व नमीका शेख यांच्या सोबत ‘लुम अलर्ट’च्या मॉडेलची डिझाईन दिली व याला त्यांना आंतराष्ट्रीय पेटंट मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामधून डॉ. ढोबळे हे समाजपयोगी संशोधनावर भर देत विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती तयार करित आहे व त्यांनी सांगितले की विद्यापीठ हे समाजपयोगी संशोधन करून समाज सेवा करने ही विद्यापीठाची जबाबदारी जबाबदारी आहे, असे डॉ. संजय ढोबळे म्हणाले. वरील समाजपयोगी संशोधनाबद्दल व आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाल्यामुळे डॉ. संजय ढोबळे, खुशबु सिंग व नमीका शेख यांचे प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे), प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर व त्यांच्या सहयोगी संशोधक चमूनी अभिनंदन केले आहे.