नागपूर : साळीच्या एक महिन्याच्या बाळाचा चाकुने भोसकून खून करणाऱ्या क्रूरकर्मा आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. अली यांनी आजन्म सश्रम कारावासची शिक्षा ठोठावली.

गणेश गोविंदराव बोरकर (४०, रा. वडोदा ता. कुही ), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा फिर्यादी रूपाली यांच्या मोठ्या बहिणीचा पती आहे. रूपाली या आपल्या माहेरी बाळंतपणाकरिता आल्या होत्या. रूपाली यांची मोठी बहीण प्रतीभा यांचा आरोपी पती हा घरी आला व त्यांच्या सासरच्या लोकांना त्याची पत्नी प्रतिभा हिला सासरी कुही येथे का पाठवत नाही, याचा राग मनात धरून भांडण करत होता.

हेही वाचा >>>दक्षिण नागपुरात वीज संकट, कधीही पुरवठा खंडित होण्याचा धोका, काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी रूपाली एका महिन्याच्या बाळाला घेऊन आरोपीस समजाविण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने त्यांच्या लहान बाळाला चाकुने भोसकून ठार केले.या प्रकरणाचा तपास पारशिवणीचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्यामुळे न्या. अली यांनी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ मध्ये आजीवन कारावास अशी शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे साहाय्यक सरकारी वकील पंकज तपासे यांनी बाजू मांडली.