नागपूर : कोराडी येथे प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन वीज युनिटच्या विरोधात स्थानिक नागरिक व पर्यावरणवाद्यांनी दंड थोपटले आहे. आता या वादात तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. येत्या सोमवारी ते कोराडी परिसरातील नांदगाव, वराडा येथील गावाला भेट देणार असून गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी फेब्रूवारी २०२२ मध्ये कोराडी, खापरखेडा परिसराला भेट देऊन प्रदूषणाची पाहणी केली. या परिसरातील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत तब्बल दोनवेळा ते याठिकाणी आले. प्रदूषण करणारे राखबंधारे बंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच या प्रकरणाचा शेवटपर्यंत त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर राज्यात सत्तापालट झाले. आता पुन्हा एकदा कोराडी येथे नवीन वीज युनिटवरुन आंदोलन सुरू झाले आहे.

हेही वाचा >>> “आम्हांला महाविकास आघाडीत नेण्याची जबाबदारी…”, ॲड. प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी शेतकरी, गावकऱ्यांसोबतच लगतच्या वसाहतीतील नागरिक आणि स्वयंसेवी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या नव्या वीज प्रकल्पासाठी होणाऱ्या जनसुनावणीला देखील त्यांनी विरोध केला आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान अजनीवनचे पर्यावरणवादी तसेच या आंदोलनात सहभागी सर्व त्यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नांदगाव, वराडा येथील भेटीकडे विशेष लक्ष आहे.