नागपूर : खराब हवमानामुळे नागपूर, मुंबई, बंगळुरू तसेच इतर ठिकाणीची विमाने वेगवेगळ्या शहरांकडे वळवण्यात आली. त्यामुळे संपूर्ण विमान वाहतूक व्यवस्था कोलमडली.

शमशाद-नागपूर-किशनगड हे विमान शमशादकडे वळवण्यात आले. रात्री पावणे अकरा वाजता नागपुरात आले. उशीर झाल्याने हे विमान किशनगडला गेले नाही. मुंबई-नागपूर-मुंबई हे एअर इंडियाचे विमान रात्री नऊ वाजता इंदुरकडे वळवण्यात आले. त्यानंतर हे उड्डाण रद्द करण्यात आले. इंडिगोचे मुंबई ते नागपूर हे विमान इंदूरकडे रात्री नऊच्या सुमारास वळवण्यात आले. ते विमान नागपूरला रात्री साडेअकरा वाजता आले.

Pune, railways, congestion,
पुणे : गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा नवा फंडा! आता प्रवाशांना सीटवरच मोफत पिण्याचं पाणी
pune airport latest marathi news
पुणे ठरले उणे! आंतरराष्ट्रीय उड्डाणात छोट्या शहरांनीही टाकले मागे; जाणून घ्या स्थान…
Mumbai airport, Take-off and landing,
महत्त्वाचे : मुंबई विमानतळावर ९ मे ला टेकऑफ – लँडिंग तब्बल सहा तास बंद रहाणार, वाचा सविस्तर…
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द

अहमदाबाद ते नागपूर इंडिगो विमान रात्री सव्वानऊ वाजता इंदूरकडे वळवण्यात आले. हे विमान रात्री साडेबारा वाजता नागपुरात आले. बंगळुरू ते नागपूर इंडिगो विमान हैदराबादकडे वळवण्यात आले. त्यानंतर हे विमान रात्री १२ च्या सुमारास नागपुरात आले.