India Lok Sabha Election 2024 Phase 2 Voting Updates, 26 April अकोला : अकोला लोकसभा मतदार संघात सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. नवमतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पहिल्या दोन तासात ७.१७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवार प्रकाश आंबेडकर, अनुप धोत्रे, डॉ. अभय पाटील यांनी मतदान करून आपले कर्तव्य बजावले.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून प्रारंभ झाला. अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये २०५६ केंद्रांवर मतदान सुरू झाले. सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७.१७ टक्के मतदान झाले. अकोट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८.५ टक्के तर मूर्तिजापूर मतदारसंघात सर्वात कमी ६.०५ टक्के मतदान झाले आहे. विविध मतदान केंद्रांवर विविध थीम साकारण्यात आल्या असून महिला, युवा, दिव्यांग विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. उन्हाचा पारा कमी झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…बुलढाणा : पहिल्या टप्प्यात फक्त ६.६१ टक्केच मतदान

भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी पळसो बडे येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी देखील कुटुंबासोबत मतदान केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्नी प्रा.अंजली आंबेडकर यांच्यासह अकोल्यात मतदानाचे कर्तव्य पार पाडले. दिव्यांग व महिला मतदार हिरहिरीने मतदान करतांना दिसून येत आहे.

हेही वाचा…यवतमाळ-वाशिममध्ये सकाळी नऊपर्यंत केवळ ७.२३ मतदान, समर्थकांमध्ये धाकधूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अगोदर राष्ट्रीय कर्तव्य मग लग्न

मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य अगोदर पार पाडून मग लग्नाच्या बोहल्यावर चढण्याचा निर्धार नवरदेव नवरने केल्याचे दिसून येत आहे. उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासोबत नवरदेव व नवरीने मतदान केले. तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथील मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला.