अकोला : अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. शनिवारी सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यात हे सर्वाधिक तापमान आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. गेल्या काही आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट वादळी वारे असे वातावरण होते.

…हेही वाचा >>> चंद्रपूर : तीन बाजार समित्यांवर काँग्रेसचे सभापती; दोन ठिकाणी भाजप तर भद्रावतीत ठाकरे गटाला यश

उन्हाळ्यातही पावसाळा जाणवू लागला होता. या आठवड्यात उन्हाचा चांगलाच ताप जाणवू लागला आहे. जिल्ह्याला उन्हाचे चटके बसत आहे. सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. तापमान वाढीमुळे दिवसा बाहेर पडणे कठीण झाले. रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. शुक्रवारी अकोल्यात ४४.५ अं.से. तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर आज पुन्हा सर्वाधिक ४५.६ अं.से. तापमान होते. विदर्भात चाैथ्यांदा अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. गतवर्षी २०२२ मध्ये ४ मे रोजी ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद के्ली होती. बंगालच्या उपसागरात होणाऱ्या बदलामुळे अचानक तापमानात एवढी वाढ झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भातील इतर शहरातील तापमान अमरावती ४४.६, बुलढाणा ४१.२, चंद्रपूर ४२.४, गडचिरोली ४१.६, गोंदिया ४१.६, नागपूर ४२.७, वर्धा ४४.१, यवतमाळ ४३ अं.से.