scorecardresearch

Premium

महापालिकेतील कंत्राटी परिचारिकांची पदभरती वादात; उमेदवारांमध्ये भेद केल्याचा आरोप

या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही संतप्त उमेदवारांचे म्हणणे आहे.

Allegation discrimination among candidates Recruitment contract nurses Nagpur municipal corporation
महापालिकेतील कंत्राटी परिचारिकांची पदभरती वादात; उमेदवारांमध्ये भेद केल्याचा आरोप (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: नागपूर महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत स्टाफ नर्स (कंत्राटी) पदांसाठी नुकतीच भरती झाली. यावेळी उमेदवारांची निवड करताना निकषांना हरताळ फासल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रियाच आता वादात सापडली आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत नागपूर महापालिकेकडून १० ते १७ जुलै २०२३ पर्यंत कंत्राटी परिचारिका भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात अनुसूचित जाती, भटक्या जमाती (ड), ओबीसी, ईडब्ल्यूएस या संवर्गातील नर्सेसची पदे भरावयाची होती. २३७ उमेदवारांनी अर्ज केले. १३७ पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. तात्पुरत्या स्वरूपातील ही यादी असल्याने उमेदवारांकडून १३ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप मागवले होते.

PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”
indi Alliance
“इंडिया आघाडीत फूट पडलेली नाही”; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा! भाजपा फूट पाडत असल्याचाही गंभीर आरोप
Police bravery medal gadchiroli
गडचिरोली : नक्षल्यांशी मुकाबला करणाऱ्या १९ जवानांना पोलीस ‘शौर्य’ पदक, सोमय मुंडेंना राष्ट्रपती पदक
supreme court
अदाणींविरोधातील खटला सुनावणीस घेण्यास रजिस्ट्रारचा नकार; सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं!

हेही वाचा… ९० दिवसानंतरही सापडला नाही भाजप नेत्या सनाचा मृतदेह

स्टाफ नर्स कंत्राटी पदांकरिता अंतिम वर्षातील प्राप्त गुणांच्या टक्केवारीत ५० टक्के गुण असावे, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता असल्यास २० गुण आवश्यक, अनुभव असल्यास प्रत्येक वर्षासाठी ६ गुण द्यावे असा निकष होता. गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड होणार होती. प्रत्यक्ष मुलाखत नव्हती. यामुळेच खासगी उमेदवारांना कमी गुण देत त्यांना निवडीपासून दूर ठेवल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे. यादीसंदर्भात मागवण्यात आलेल्या आक्षेपांवर थातूरमातूर उत्तरे दिल्याची तक्रारही उमेदवारांनी केली. राज्य व केंद्राचे निकष असताना स्वतःचे निकष लावण्यात आले. या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही संतप्त उमेदवारांचे म्हणणे आहे.

अधिकारी काय म्हणतात…

खासगी संस्थेतील अनुभवाच्या प्रमाणपत्रांवर आवक- जावक क्रमांक नव्हते. यामुळे तपासणीत अडचणी आल्या. यामुळे कार्यकारी मंडळात झालेल्या चर्चेनंतर खासगीतील उमेदवाराला तीन तर शासकीय संस्थेतील उमेदवारांना सहा गुण देण्याचा निकष लावून नियुक्ती केली गेली, अशी माहिती पत्रकारांनी भ्रमणध्वनीवर विचारलेल्या प्रश्नावर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Allegation of discrimination among candidates in recruitment of contract nurses in nagpur municipal corporation mnb 82 dvr

First published on: 01-11-2023 at 13:07 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×