नागपूर: मान्सूनने यंदा देशात उशिरापर्यंत वाट पाहायला लावली. बऱ्याच उशिराने तो दाखल झाला, पण जूनच्या मध्यान्हनंतर आलेल्या मान्सूनने येताक्षणीच वेग पकडला. त्यामुळे उशिरा आला असला तरी सहा दिवस आधीच मान्सूनने देश व्यापला आहे.

राजस्थान, हरियाणा आणि उर्वरित पंजाबचा भाग मान्सूनने व्यापल्याचे जाहीर करत सरासरी तारखेच्या सहा दिवस आधीच तो पूर्ण देशात पोहोचल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले. सर्वसाधारणपणे आठ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशात पोहोचतो. मान्सून यंदा देशात आठ जूनला दाखल झाला. त्यानंतर बारा जूनपर्यंत महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत प्रवास करून बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढील प्रवास रेंगाळला.

हेही वाचा… नागपूर: ऊनपावसाचा खेळ! जुलैची सुरुवात समाधानकारक, तरीही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२२ जूनपासून मान्सूनला चालना मिळाली आणि त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत देशातील उरलेला प्रवास पूर्ण केला. हा प्रवास इतर वेळी एक जून ते आठ जुलै या कालावधीत सुरू असतो. दरम्यान महाराष्ट्रामध्ये पुढील चार दिवसांमध्ये बहुतांश सर्व ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर सोमवारनंतर विदर्भातही बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात मंगळवारी पावसाची व्याप्ती वाढू शकेल तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.