नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर मध्ये उद्या (१७ फेब्रुवारी) भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचे आगमन होत आहे. ते हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. पण त्यांचा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भेटीचा योग नाही. कारण भागवत आजपासून (१६ फेब्रुवारी)  २० तारखेपर्यंत रायबरेली ( उ. प्र) दौ-यावर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उपमुख्यमंत्र्यांचे विश्वासू सचिव सुमित वानखेडे यांचा वारंवार होणारा वर्धा जिल्हा दौरा; रहस्य काय, वाचा…

अमित शहा यांचा नागपूर दौरा ठरल्या पासून ते संघ मुख्यालयाला भेट देणार का? तेथे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची भेट घेणार का? याबाबत उत्सुकता होती.  दौ-याचा अधिकृत कार्यक्रम आल्यावर त्यात संघ मुख्यालयाल भेटीचा समावेश नव्हता. मात्र ते रेशीमबागेतील हेडगेवार स्मारकाला भेट देणार असल्याचा उल्लेख आहे. परंतु शहा येण्याच्या एक दिवस आधीच १६ फेब्रुवारीला सरसंघचालक डॉ मोहन भागवत रायबरेलीकडे रवाना झाले. तेथे१७ व १८ ला संघाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah not to meet mohan bhagwat during his nagpur tour cwb 76 zws
First published on: 16-02-2023 at 12:17 IST