लोकसत्ता टीम

यवतमाळ : बनावट भागीदारी दस्त्याच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या बनावट बँक खात्यात शासकीय कामाची रक्कम वळती करण्यात आली. अशाप्रकारे कंत्राटदाराची आठ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कंत्राटदाराने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

शरद सुभाषचंद्र भूत (४९, रा. बाजोरीयानगर, साईमंदिर) असे फसवणूक झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. फसवणूकप्रकरणी कंपनी भागीदार अनिल सीताराम सेवदा (४९, रा. वडगाव रोड), बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक, सा.बा. अचलपूर कार्यकारी अभियंता, अचलपूर कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था गडचिरोली, रमेश गम्पावार (रा. एटापल्ली, जि. गडचिरोली), प्रताप व्यंकटस्वामी कोलमपल्ली (रा. सिरोंचा), चुन्नीलाल दुर्गाप्रसाद शर्मा (रा. धारणी), अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

आणखी वाचा-कुपोषणाचा विळखा घट्ट ! गोंदिया जिल्ह्यात १,५९९ अतितीव्र कुपोषित बालके; पोषण आहारावर लाखोंचा खर्च, मात्र…

शरद भूत यांचा श्यामबाबा इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स, यवतमाळ नावाने व्यवसाय आहे. या कंपनीत अनिल सेवदा यांची भागीदारी आहे. बाजोरीयानगरात भागीदारी दस्त बनवला होता. २०१८ पासून भूत व सावदा यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारी कामे घेतली होती. सेवदा यांची हरिदर्शन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनी होती. त्यामध्ये भूत यांना २०१७ मध्ये सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम दिले. कंपनीने शासनाकडून काम घेतल्याने पैसे हरिदर्शन कंपनीत जमा झाले. मात्र, सेवदा यांनी रक्कम दिली नाही. त्यासाठी विविध कारणे सांगण्यात आले. त्यानंतर दोघांनी शामबाबा कंपनी दोघांनी भागीदारीत सुरू केली. संस्थेची नोंदणी करतेवेळी स्टेट बँक ऑफ इंडिया, मेनलाईनमधील शाखेत खाते सुरू केले हाते. शासकीय व निमशासकीय कामासाठी या खात्याचीच माहिती संबंधित विभागांना दिली होती.

आणखी वाचा-वर्धा: गाडी दिली नाही म्हणून चक्क बापानेच तोडला मुलाचा लचका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, त्यानंतर दोघांत वाद झज्ञल्याने एसबीआयचे खाते पत्र देवून व्यवहार बंद केले होते. ३ जुलै २०२३ ला सीएचा कर भरणा करण्यासाठी फोन आला. स्टेट बँकेच्या खात्यात पैसे शिल्लक नाही. मात्र, कामाचा मोबदला देण्यात आल्याचे सांगितले. ही रक्कम गडचिरोली येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जमा झाले होते. सदर खाते क्रमांक बंद करण्यासाठी भूत यांनी पत्र दिले होते. कामाची रक्कम यवतमाळच्या एसबीआय शाखेत वर्ग होणे क्रमप्राप्त होते. मात्र, भागीदार, शाखा व्यवस्थापक व अधिकार्‍यांनी संगनमत करून बनावट भागीदारी दस्तच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या बनावट खात्यात आठ कोटी ३० हजार ५४० रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यावर भूत यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कंपनी भागीदारासह अन्य सात जणांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला.