अमरावती : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळविहीर या गावानजीक एसटी बसला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. बसचालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवली. बसमधील सर्व ३५ प्रवासी सुखरूप असून बस जळून खाक झाली. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प पडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा…नागपुरात १९ नोव्हेंबरला ‘एअर शो’ ; विमानाच्या हवाई कसरती बघण्याची संधी

हेही वाचा… वाशीम : ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने हॉटेल्स , मंगल कार्यालये बुक

राष्ट्रीय महामार्गावर अमरावतीपासून २५ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. बसमधून धूर निघत असल्याचे एसटी बसचालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने लगेच बस रस्त्याच्या कडेला थांबवली. या बसमधून सुमारे ३५ प्रवासी प्रवास करीत होते. त्यांना लगेच खाली उतरविण्यात आले. त्यानंतर बसने पेट घेतला. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati st bus catches fire on national highway alert bus driver saves 35 passengers life asj
First published on: 01-11-2022 at 18:24 IST