नागपूर : हिंगणा तालुक्यातील उखळी गावात एका ११ वर्षीय मुलावर शनिवारी सायंकाळी मांजराने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला ओकारी आली. त्यानंतर काही तासातच मुलाचा मृत्यू झाला. श्रेयांशू क्रिष्णा पेंदाम (११) रा. उखळी, ता. हिंगणा असे या मृत मुलाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास श्रेयांशू काही मित्रांसोबत खेळत होता. सायंकाळी ६ वाजता तो घरात आला. खेळत असताना मांजराने त्याच्यावर हल्ला केला व त्याच्या पायाचा चावा घेतला. तो धावतच घरी गेला आणि घटनेबाबत आईला सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्याला मळमळ आणि ओकाऱ्या सुरू झाल्या. त्याच्या आईवडिलांनी त्याला डिंगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल, असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>कुनोत ‘गामीनी’ चित्त्याने दिला पाच बछड्यांना जन्म

शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्टता

मांजराने चावा घेतल्याने मृत्यू ही दुर्मिळ घटना आहे. मांजराने चावा घेतल्यानंतर इतक्या कमी वेळात मृत्यू होणे कठीण आहे. मांजराच्या हल्ल्यामुळे मुलगा घाबरल्याने त्याला ओकाऱ्या आल्या. ओकारी बाहेर न येता घशातून श्वसननलिकेत जाऊन श्वास रोखल्याने हृदयघात झाला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुलाचा नेमका मृत्यू कशामुळे हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल, असे हिंगणा तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण पडवे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An 11 year old boy died after being bitten by a cat in ukhali village of hingana taluka amy
First published on: 10-03-2024 at 21:25 IST