बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात काल मंगळवारी, २७ रोजी सायंकाळी उशिरा सुमारास अवकाळी पावसाने दमदार व संततधार हजेरी लावली. यावेळी शेतातून परतणाऱ्या मजुरा पैकी एक मजूर नाला ओलांडताना त्यामध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

धोंडोजी भगवान इंगळे( वय ७० वर्षे असे वाहून गेलेल्या शेतमजुराचे नाव आहे. घारोड ते अकोली या दरम्यान असलेला नाला पुतण्या राहुल इंगळे याच्यासोबत ते ओलांडत होते.दरम्यान नाल्यातील पाण्याची पातळी आणि प्रवाहाचा वेग अचानकपणे वाढला. यामुळे धोंडोजी इंगळे हे वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच खामगाव खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांनी आपल्या पथकासह शोध कार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत गावाकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र आज बुधवारी, २८ मे रोजी सकाळपर्यंत त्यात त्यांना यश आले नव्हते. याशिवाय याचपरिसरात भागामध्ये चार दुचाकी ही नाल्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

शेगाव तालुक्यात अनेक गावे अंधारात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील आठवडाभरापासून बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांचा शेतकऱ्यांची अक्षरशः दाणादाण उडालेली आहे. दररोज सायंकाळी कुठे ना कुठे मुसळधार पावसाची हजेरी राहत असल्यामुळे उन्हाळी शेती पिक आणि फळबागांना मोठा फटका बसत आहे. यामध्ये मंगळवारी सायंकाळ पासून रात्री उशिरापर्यंत शेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि सुटलेल्या सुसाट वाऱ्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेगाव ते वरवट मार्गावर असलेल्या कालखेड, मनसगाव, आडसूळ, झाडेगाव, येऊलखेड या शिवारात अनेक झाडे म्हणून पडली होती. यामुळे रात्री या भागामध्ये वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनाही झाल्या. दुसरीकडे या भागातील विद्युत पुरवठा करणारी इलेक्ट्रिक खांबे कोसळल्याने अनेक गावे रात्रीपासून अंधारात आहेत.