वर्धा : सर्वाधिक नासाडी व प्लास्टिक कचरा हा सार्वजनिक जेवणावळीतून होत असल्याचे पाहायला मिळते. अशा समारंभात ताट, वाट्या, पेले अशी भांडी आता जवळपास हद्दपार झाली आहेत. त्याऐवजी प्लास्टिक किंवा डिस्पोजेबल म्हटल्या जाणारी भांडी वापरल्या जात आहेत. मात्र त्यामुळे होणारे प्रदूषण कोणी गांभीर्याने घेत नाही.

घरोघरी होणाऱ्या समारंभात अशी एकदा वापरली जाणारी भांडी मोठा कचरा निर्माण करीत असल्याचे पाहून येथील गुंज ही संस्था चिंतेत पडली. पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारी ही संस्था गृहिणींनी आता प्लास्टिक हटावसाठी कार्यरत केली. प्लास्टिक भांड्याऐवजी संस्थेतर्फे नाममात्र शुल्कात स्टीलची भांडी पुरविल्या जात आहे.

हेही वाचा – रात्रीच्या अंधारात कारध्याच्या धोकादायक लहान पुलावर चालतं असं काही; जिल्हा प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष

हेही वाचा – राज्यात पुढील पाच दिवस महत्त्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरच्या छोटेखानी भोजन सोहळ्यात ताट, वाटी व पेले संस्थेतर्फे केवळ पन्नास रुपये आकारून दिल्या जात आहेत. काही रक्कम ठेव स्वरुपात घेतल्या जाते. ती भांडी परत केल्यावर वापस मिळते. संस्थेच्या हर्षा परमानंद टावरी सांगतात की हा एक छोटा प्रयत्न आहे. प्रतिसाद पाहून भांडी वाढवू. या निमित्ताने प्लास्टिक भोजनातून बाद करण्याचा संदेश दिल्या जात आहे. घरगुती भोजन समारंभात गृहिणीच निर्णय घेत असतात. म्हणून घरातील महिलेवर प्लास्टिक हद्दपार करण्याचा संस्कार होणे आवश्यक ठरते, असे टावरी म्हणतात.