नागपूर: प्रेमप्रकरण कुटुंबियापर्यंत पोहचल्यामुळे तरुणीने अचानक दुरावा केल्यावरून नाराज इंस्टाग्रामवरील मित्राने तरुणीला अश्लील मॅसेज केले. त्या युवकाची समजूत घातल्यानंतरही तो मॅसेज पाठवत होता. अखेर पोलिसात तक्रार करण्यात आली.

पोलिसांनी १७ वर्षीय पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. प्रयास विजय सुके (२३) रा. गगनदीप सोसायटी, ओंकारनगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा… नागपुरातील मेयो रुग्णालयात सहा महिन्यात खुबा- गुडघा प्रत्यारोपणाचे अर्धशतक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जानेवारीत तरुणीची इंस्टाग्रामवर प्रयास सुकेशी ओळख झाली होती. दोघांमध्ये मैत्री होऊन दररोज चॅटिंग होऊ लागली. तरुणीच्या आईला याबाबत समजले. त्यांनी मुलीला फटकारले. त्यानंतर तरुणीने प्रयासपासून दुरावा करीत बोलणे बंद केले. या प्रकारामुळे प्रयास चिडला. त्याने तरुणीला इंस्टाग्रामवर अश्लील मॅसेज पाठविण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याला ‘ब्लॉक’ केले. त्यानंतर प्रयास दुसरे खाते उघडून मॅसेज पाठवू लागला. त्याने व्हॉट्सअ‍ॅपवरही तरुणीला अश्लील मॅसेज पाठवले. शेवटी त्रस्त होऊन तरुणीने आईला याबाबत सांगितले. दोघींनीही हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रयासला अटक केली.