नागपूर : संगमनेर आणि कोल्हापूर येथे झालेल्या दंगलीबाबत राष्ट्रवादी भाजपाविरोधात आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी दंगलीला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप केला. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर भाष्य केले आहे.
हेही वाचा – “अचानक औरंगजेबाच्या औलादी कोठून पैदा झाल्या?”; काय म्हणाले फडणवीस?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नागपूर येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख म्हणाले, समजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक करीत आहे. हे दुर्दैवी आहे. निवडणुका तोंडावर असल्या की मोठ्या दंगल घडवून त्याचा राजकीय फायदा घेतला जातो, पण नागरिकांनी याला बळी पडू नये.