लोकसत्ता टीम

वर्धा : लोकसभा निवडणुकीत उमेदवाराच्या मदतीस किंवा प्रचारासाठी आप्त किंवा मित्र मंडळी येत असतात. तसेच पक्षाचे बडे नेते तळ ठोकून बसतात. आघाडीचे अमर काळे यांच्यासाठी पण बाहेरील जिल्ह्यातून बडे नेते, आप्त तळ ठोकून बसली हाती. त्यांचे मामा अनिल देशमुख, माजी पालकमंत्री सुनील केदार तसेच आमदार अभिजित वंजारी हे तीन बडे नेते १५ दिवसांपासून मुक्कामी होते. त्यांनीच काळे यांच्या प्रचाराची सूत्रे हाताळली.

आणखी वाचा-वाशीम : नवरदेवाने बोलल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, ते आता कुठेच दिसत नाही. कारण तसे मोठेच. निवडणूक आचारसंहिता म्हणते की बाहेरील जिल्ह्यातील प्रभावी व्यक्तींनी मतदानाच्या ४८ तासापूर्वी मतदारसंघ सोडला पाहिजे. त्याची जाणीव होताच देशमुख, केदार व वंजारी यांनी वर्धेतील मुक्काम आपल्या मूळ गावी नागपूरला हलवला. दक्ष निवडणूक यंत्रणेच्या नजरेत येण्यापूर्वीच गाव सोडलेले बरं, असे त्यांनी ठरविले असणार.