महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : देश- विदेशात अ‍ॅल्युमिनिअम- स्टिल उद्योगातून निघणाऱ्या कचऱ्याची (लाल गाळ) विल्हेवाट हा चिंतेचा विषय आहे. या कचऱ्यावर भोपाळच्या सीएसआरआय- अ‍ॅडव्हान्स मटेरियल अ‍ॅन्ड प्रोसेस रिसर्च इन्स्टिटय़ूटने (सीएसआयआर- एम्प्री) संशोधन करत क्ष- किरण विरोधी टाईल्स तयार केली. ही टाईल्स एक्स-रे, सीटी स्कॅन तपासणी यंत्राच्या खोलीत लावणे फायदेशीर आहे. या संशोधनाला स्वामित्व हक्कही मिळाले आहे.

fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

 नागपुरातील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या सीएसआईआर- एम्प्रीतर्फे ही टाईल्स प्रदर्शनात ठेवली होती. या टाईल्सच्या संशोधनात भूमिका बजावणारे संस्थेचे संशोधक राहुल आर्या म्हणाले, जगात या पद्धतीचे हे पहिले संशोधन आहे. सध्या सर्वत्र अ‍ॅल्युमिनिअम, स्टिलचे उत्पादन वाढत आहे. या उद्योगातून मोठय़ा प्रमाणावर निघणाऱ्या लाल गाळात अपायकारक क्षार असतात. हा गाळ माती, भूजल प्रदूषित करते.

भारतातही अ‍ॅल्युमिनिअम व स्टिल उद्योग मोठय़ा प्रमाणावर असून आपला देश लाल चिखल तयार करणाऱ्या देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या चिखलाच्या विल्हेवाटीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी भोपाळच्या सीएसआईआर- एम्प्री संस्थेने संशोधन सुरू केले. सुमारे तीन ते चार वर्षे त्यावर काम केले गेले. त्यात या चिखलापासून टाईल्स विकसित केली गेली. ही टाईल्स क्ष- किरण विरोधी असून ती क्ष- किरण तपासणी यंत्र असलेल्या खोलीत लावणे फायद्याचे आहे. सध्या क्ष- किरण तपासणी होणाऱ्या खोलीत शिशापासून तयार टाईल्स वापरली जाते. ही टाईल्स महाग व विषारीही होती. परंतु सीएसआईआर- एप्रीने तयार केलेली टाईल्स ही विषारी नसून पूर्वीच्या टाईल्सच्या तुलनेत जास्त फायद्याची व वजनाने हलकी असल्याचेही  आर्या यांनी सांगितले. या टाईल्सचे अधिकार नुकतेच जॉनसन्स इन्डय़ोरा या कंपनीला हस्तांतरीत करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून  ही टाईल्स निर्माण करून बाजारात आणली जाणार आहे.  विक्री सुरू झाल्यावर सीएसआयआर- एम्प्रीला उत्पन्न (रॉयल्टी) मिळणार आहे.

देशात तीन ठिकाणी वापर

‘सीएसआयआर- एम्प्री‘चे संचालक डॉ. अविनाश कुमार श्रीवास्तव यांच्या प्रयत्नातून  टाईल्स प्राथमिक स्वरूपात देशातील इंडियन नेव्हीच्या तामिळनाडूतील संस्था, महाराष्ट्रातील साईदीप हेल्थकेअर प्रा. लिमिटेड (अहमदनगर), सीएसआईआर- एम्प्रीच्या भोपाळ या तीन संस्थेतील क्ष- किरणीय तपासणी खोलीत लावण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे, अशी माहिती सीएसआईआर- एम्प्रीच्या भोपाळ येथील प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. शाबी थंकराज सलाममल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.