नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात मराठी भाषेबाबत अनास्था कायमच असल्याचे वास्तव माहिती अधिकारातून समोर आले आहे. मराठी पाट्यांबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नसल्याने भाषाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेने सात झोनमधील दुकानांची माहिती दिली असून त्यात मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक २८४ दुकानांवर मराठी पाट्या आहेत. हनुमान नगर झोनतंर्गत सर्वात कमी म्हणजे ६४ दुकानांवर मराठी पाट्या आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, धरमपेठ झोन क्रमांक २ मध्ये सुपर मार्केटमध्ये ३३, नेताजी मार्केटमध्ये ४२, मोदी नं २ मध्ये मनीष मार्केट ६, झोन क्रमांक ३ हनुमाननगर येथे मोडिकल चौक येथे ३३, राष्ट्रीय गांधी मार्केट सक्करदरा येथे ३१ दुकानांवर मराठी पाट्या आहेत.

हेही वाचा… आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल, तहसीलदारांनी न्याय देण्याऐवजी…

धंतोली झोन क्रमांक ४ मध्ये महात्मा फुले भाजी मार्केट येथे ८४, महात्मा फुले मार्केट, सुभाष पार्क भापकर पार्क, भवनाचे दक्षिण भागातील व रेल्वे फिडर रोड, न्यू कॉटेन मार्केट ,मध्यवर्ती बस स्थानक परिसर या भागातील १७३ दुकानांवर तर गांधीबाग झोन क्रमांक ६ येथे चिटणीस पार्क येथे १४, बगडगंज रोड वरील अस्थायी जागेवरील ५, महाल टांगा स्थानक मिनी शॉप येथे २१, बाबुलाल टक्कामोरे मार्केट येथे १२, हरिगंगा बिल्डिंग येथे १९, रेल्वे परिसर संत्रा मार्केट परिसर १६ , गांधीबाग १३ दुकानावर मराठी पाट्या लावण्यात आल्या आहेत.

हेही वाचा… डाव्या विचारांमुळे नकारात्मकता? ‘अभाविप’चे देशभर ‘चलो कॅम्पस’ अभियान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ इतवारी परिसरात १७७, आशीनगर झोन क्रमांक ९ येथए कमाल चौक परिसरात ९६ आणि झोन क्रमांक १० येथे मंगळवारी कॉम्पलेक्स परिसरात ४०, सदर ३९, सदर लिंक रोड ५२, गड्डीगोदाम मार्केट ६२ आणि रेल्वे स्टेशन मार्केट ३९ दुकानावर मराठी पाट्या आहेत. लक्ष्मीनगर, नेहरुनगर आणि लकडगंज झोनतंर्गत अससेल्या दुकानांवरील मराठी पाट्यांची माहिती महापालिकेने उपलब्ध करुन दिलेली नाही. चौकट दुकानांवरील पाट्या मराठीत नसणे ही अतिशय गंभीर बाब आहे. संबंधित अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणारी यंत्रणा काय करत आहे, त्यांना जाब न विचारणारे सरकार देखील काय करत आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे.डाॅ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रमुख संयोजकमराठीच्या व्यापक हितासाठी.