वर्धा : सुविख्यात मोबाईल कंपनी ॲपलने सेवाविषयक घोषणा केली आहे. फोन चार्जिंगला ठेवून जवळच झोपताना होणारा संभाव्य धोका ग्राहकांना सांगत सावध केले आहे. कंपनीने सावध करताना प्रामुख्याने अयोग्य पद्धतीने चार्जिंग करण्याचे धोके स्पष्ट केले.

हेही वाचा – अकोला : पतीचे दुसरीवर जडले प्रेम, घटस्फोटासाठी पत्नीचा छळ

हेही वाचा – वाशीम जिल्ह्यातील ९६ अंगणवाड्यांना स्वंतत्र इमारतीची प्रतिक्षा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चुकीच्या पद्धतीने चार्जिंग केल्यास आग लागणे, इलेक्ट्रिक शॉक, दुखापत तसेच आयफोन किंवा आजुबाजूस असलेले साहित्य क्षतिग्रस्त होण्याची शक्यता वाढते. म्हणून प्राधान्याने बंदिस्त जागेत म्हणजे पांघरूण, उशीखाली फोन ठेवून चार्जिंग करू नये. चार्जिंग सुरू असताना मोबाईल, अडाप्टर, वायरलेस चार्जर यावर झोपू नये किंवा ते पांघरुणात ठेवू नये. मोकळ्या हवेशीर जागेतच आयफोन, चार्जर, अडाप्टरचा उपयोग करावा. मेड फॉर आयफोन केबल्सच वापरावे. तेच सुरक्षा नियमास धरून असतात. पाणी किंवा अन्य द्रवरूप पदर्थांजवळ चार्जिंग करणे टाळावे. तुटफूट झालेले चार्जर वापरणे टाळावे, अशी सूचना कंपनीने ग्राहकांना नव्या घोषणेत केली आहे.