लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : सैन्यदलात भरती होत देशसेवा करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. दलात विविध जबाबदाऱ्या असतात. त्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जात असतात.

आता सैन्यदलाकडून टेक्निकल एन्ट्री स्कीमसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लष्करातील तांत्रिक, अभियांत्रिकी सेवांसाठी ही भरती केल्या जाते. प्रवेशासाठी उमेदवारांना जेईई २०२३ अनिवार्य आहे. तसेच उमेदवाराने बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणितात किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करतांना किमान वय १६.५ वर्षापेक्षा अधिक आणि कमाल १९.५ वर्षापेक्षा जास्त असू नये.

आणखी वाचा-नीट परीक्षार्थी विद्यार्थ्याची सातव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या

प्रवेश अर्ज प्रक्रिया १३ ऑक्टोंबर ते १२ नोव्हेंबर पर्यंत आहे. यात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची पदवी घेता येते. सैन्यदलाच्या जॉईन इंडियन आर्मी या वेबसाईट वर अर्ज उपलब्ध होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apply free for army recruitment pmd 64 mrj
First published on: 08-10-2023 at 12:04 IST