नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी मंडळावर प्रथमच विदर्भातील विविध जिल्ह्यांतील ११ कलावंताची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा – तिर्थयात्रेकरूंसाठी आनंदवार्ता! रामेश्वरम, तिरुपती, श्री शैलमचे दर्शन सुलभ; रेल्वेची ‘दक्षिण भारत शुभ यात्रा’ स्पेशल ट्रेन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांतून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर अध्यक्ष व अशासकीय सदस्य या पदावर नियुक्तीसाठी रंगभूमीशी संबंधित नाट्य लेखन, नाट्य व्यवस्थापन, नाट्य निर्मिती, नाट्य कलाकार, कोणत्याही विद्यापीठातील मराठी नाट्यशास्त्र विषयाशी संबंधित प्राध्यापक, नाट्य परिक्षक, साहित्यिक, तसेच प्रतिष्ठीत नाट्य आणि एकांकिका स्पर्धामध्ये तसेच रंगभूमीशी संबंधित महोत्सवामध्ये अविष्कार सिद्ध केलेल्या व्यक्ती (कलाकार/ तंत्रज्ञ) इत्यादी क्षेत्रातील कलावंताचे अर्ज मागविण्यात आले होते. या ३६ सदस्यीय असलेल्या रंगभूमी परीनिरीक्षण मंडळात विदर्भातील ११ कलावंताचा समावेश आहे. त्यात नागपुरातून संजय भाकरे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे तर विदर्भातून विशाल तराळ (अमरावती) , रमेश थोरात (अकोला) सुधीर गीते (बुलढाणा), रवींद्र नंदाने (वाशीम), डॉ. दिलीप अलोणे (वणी- यवतमाळ), सुनील देशपांडे (भंडारा) सदानंद बोरकर (गोंदिया), अरविंद बाभळे (वर्धा), मुकेश गेडाम (चंद्रपूर), डॉ. परशुराम खुणे (गडचिरोली) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.