चंद्रपूर : राजुरा येथील पुर्वशा सचिन डोहे यांची रविवारी (२३ जुलै) काही गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना ताबडतोब अटक करण्याचे व कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

हेही वाचा – वाशिम : मुसळधार पावसामुळे नद्या, नाले तुडुंब; नाला खोलीकरण, रुंदीकरण कामाचा खोळंबा

हेही वाचा – बुलढाणा : अतिवृष्टीचा संग्रामपूर, जळगावला तडाखा! हजारो हेक्टर जमीन खरडली; दोनशे जनावरे दगावली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणारे, गोळीबार करणारे आणि समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरवीणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. या दुर्देवी घटनेची गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन दोषींना अटक करत याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना दिले आहेत.