चंद्रपूर : चिमूर क्रांतीभूमित पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॉंग्रेस खासदार राहुल गांधी या दोघांनी अनुक्रमे भाजप उमेदवार आमदार किर्तीकुमार भांगडीया व कॉग्रेस उमेदवार सतिश वारजूरकर यांच्यासाठी जाहीर सभा घेतल्या. येथे भाजपचे भांगडीया १० हजार १७१ मतांनी विजयी झाल्याने क्रांतीभूमित मोदी जिंकले, गांधी हरले अशी चर्चा सुरू झाली आहे.

चिमूर क्रांतीभूमी ही कॉग्रेसचा गड होती. मात्र २०१४ मध्ये सर्वप्रथम किर्तीकुमार उर्फ बंडी भांगडीया यांनी कॉग्रेसच्या या गडाला सुरूंग लावला. त्यानंतर भांगडीया २०१९ व आता २०२४ मध्येही विजयी झाले आहेत. भांगडीया यांना १ लाख १५ हजार ८६३ मते मिळाली तर वारजूरकर यांना १ लाख ५ हजार ६९२ मते मिळाली. भांगडीया १० हजार १७१ मतांनी विजयी झाले.

हेही वाचा…Gadchiroli Election Result 2024 : धर्मरावबाबांनी अहेरीचा गड राखला, गडचिरोलीत भाजपचे वर्चस्व; आरमोरीत काँग्रेसची मुसंडी

या क्रांतीभूमित भांगडीया यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर सभा घेतली होती. या सभेला लोकांनी गर्दीही केली होती. तर कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही या भूमित सभा झाली. मात्र लोकांनी मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवत भांगडीया यांना विजयी केले तर वारजूरकर यांना पराभूत केले. त्यामुळे आता क्रांतीभूमित मोदी जिंकले व गांधी हरले अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा…सिंदखेडराजात माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक पराभव; बुलढाण्यात संजय गायकवाड विजयी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे, क्रांतीभूमित सर्वाधिक ८१.९५ टक्के मतदान झाले. या वाढलेल्या मतदानाचा फायदा भांगडीया यांनाच झाला. ही सर्व मते क्रांतीभूमितील लाडक्या बहिणींची होती अशीही चर्चा आता सर्वत्र आहे.