चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात बबली वाघीण व तिच्या दोन बछड्यांनी पर्यटकांना वेड लावले आहे. या दोन बछड्यांच्या ‘मस्ती की पाठशाळा ‘चे छायाचित्र पर्यटकांनी टिपले आहे. यामध्ये दोघेही धमाल मस्ती करताना दिसल आहे.

ताडोबा बाफरच्या अलिझनजा परिसरात बबली वाघिणीच्या दोन बछड्यांची मस्ती करतानाचे छायाचित्र मुंबईचे पर्यटक विवान करापूरकर व चालक प्रवीण बावणे यांनी कॅमेऱ्यात टिपले आहेत. मंगळवारी सकाळी दोघेही अलिझनजा बफर झोन परिसरात सफारी करीत होते. या भागातील जंगलात सध्या बबली वाघीण व तिचे तीन बछडे, भानुसखिंडी वाघीण व तिचे दोन बछडे, छोटा मटका या वाघाचं अधिवास आहे. त्यापैकी बबली व तिचे तीन बछडे सध्या नऊ ते दहा महिन्यांचे झाले आहेत. या बछड्यांना बबलीने अनेक प्रकारचे शिक्षण दिले, त्याच शिक्षणाची प्रात्यक्षिके बबलीचे बछडे करीत स्वतःला शिकार व आत्मरक्षा करण्यासाठी कसरत करीत आहेत.

हेही वाचा – वर्धा : ‘करपावती दाखवा अन् कुंड्या घ्या;’ ग्रामपंचायतीची करवसुलीसाठी अनोखी शक्कल

हेही वाचा – जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त न करता बेरोजगार डीएड, बीएड युवकांना संधी द्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचाच एक भाग म्हणून बबलीच्या दोन बछड्यांत सुरू असलेल्या मस्तीवजा लढाईचा क्षण मंगळवारी सकाळी मुंबईचे फोटोग्राफर विवान करापूरकर व चालक प्रवीण बावणे यांनी टिपला व तो समाजमाध्यमावर व्हायरल केला आहे. या छायाचित्रात दोन्ही बछड्यांच्या मस्ती की पाठशाळाचे प्रसंग टिपण्यात आले आहेत.