पोलीस निरीक्षकाने बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल केल्याने कारागृहात राहावे लागले. न्याय मिळत नसल्याने अखेर त्याने आज प्रजासत्ताक दिनी थेट वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- नंदुरबार : दुरुस्तीअभावी तरंगत्या दवाखान्याचा बुडतीचा काळ; गळतीमुळे सरदार सरोवराच्याकाठी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील ज्ञानेश्वर पोधाडे यांच्यावर तत्कालीन पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी पोस्को अंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळं नाहक  कारागृहात राहावे लागले. पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही न्याय मिळाला नसल्याने, ज्ञानेश्वर पोधाडे यांनी आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला असता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान आत्मदहणाचा प्रयत्न करणारे ज्ञानेश्वर पोधाडे यांना शहर पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.