नागपूर : औरंगजेबाबाबत “औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचे मंदिरही तोडले असते ना?” असे आपण केलेले वक्तव्य स्वाभिविकच आहे, कारण आपली सर्वस्व श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली. नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना या संदर्भात पत्र पाठवले आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपची मोहिम; मुनगंटीवार की अहिर ?

आव्हाड यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही. काकाप्रमाणे पुतण्याही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर ‘ नाहीत असे सभागृहात घोषित करतात.

हेही वाचा >>> MSEB Employee Strike: उपमुख्यमंत्र्यांच्या विभागात संपाला सर्वाधिक प्रतिसाद, तब्बल ९० टक्के कर्मचारी संपावर

औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्यातरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले. आपल्या माहितीसाठी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदीरांची यादी देत आहे. मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही असेही राणे यांनी पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा >>> शिक्षक मतदारसंघ; प्रमुख नेत्यांशी फडणवीस यांच्या बैठकीनंतर भाजप उमेदवाराबाबत उत्सुकता वाढली

औरंगजेबाने हिंदूची जी तोडलेली मंदीरे आहे त्यात

सोमनाथ मंदीर

कृष्ण जन्मभूमी मंदीर

काशी विश्वनाथ मंदीर

विशश्वेर मंदीर

गोविंददेव मंदीर

विजय मंदीर

भीमादेवी मंदीर

मदन मोहन मंदीर

चौंषष्ठ योगिनी मंदीर

एलोरो मंदीर

त्र्यंबकेश्वर मंदीर

नरसिंगपूर मंदीर

पंढरपूर या मंदिरांचा समावेश आहे