scorecardresearch

MSEB Employee Strike: उपमुख्यमंत्र्यांच्या विभागात संपाला सर्वाधिक प्रतिसाद, तब्बल ९० टक्के कर्मचारी संपावर

Maharashtra Mahavitaran Worker Strike : उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागातच सर्वाधिक  ९० टक्के महावितरणचे कर्मचारी संपावर आहेत.

MSEB Employee Strike: उपमुख्यमंत्र्यांच्या विभागात संपाला सर्वाधिक प्रतिसाद, तब्बल ९० टक्के कर्मचारी संपावर
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

महेश बोकडे

नागपूर: वीज कर्मचाऱ्यांच्या संपाची तीव्रता आता राज्यभरात वाढत चालली आहे. उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागातच सर्वाधिक  ९० टक्के महावितरणचे कर्मचारी संपावर आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने आज ३ जानेवारी च्या मध्यरात्री पासून ७२ तासांचा संप सुरू झाला. संपात ३१ संघटनांचा सहभाग आहे. ३ जानेवारीच्या मध्यरात्री  १२ ते ४ जानेवारीच्या सकाळी ८ पर्यंत संपूर्ण राज्यात संपात सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या- ८४ टक्के होती. औरंगाबाद विभागात (औरंगाबाद परिमंडळ,लातूर परिमंडळ,नांदेड परिमंडळ ) – ७९ टक्के कर्मचारी संपात सहभागी होते.

हेही वाचा >>> “संपामुळे भयभीत होऊ नका”, MSEB संचालकांच्या ट्वीटवर युजर्स म्हणाले, “काय खोटं बोलता…”

कल्याण विभागातील ( भांडुप  परिमंडळ, कल्याण परिमंडळ, नाशिक  परिमंडळ, रत्नागिरी परिमंडळ, जळगाव परिमंडळ, रत्नागिरी परिमंडल ) – ८६ टक्के कर्मचारी संपात होते. पुणे विभागातील (पुणे  परिमंडळ, बारामती  परिमंडळ, कोल्हापूर परिमंडळ)  – ७६ टक्के कर्मचारी संपात होते. संपाला सर्वाधिक प्रतिसाद नागपूर विभागात आहे. विभागातील (नागपूर परिमंडळ, अकोला  परिमंडळ, अमरावती  परिमंडळ, चंद्रपूर  परिमंडळ, गोंदिया परिमंडळातील तब्बल ९० टक्के कर्मचारी संपावर आहे. दुपारनंतर संपाची तीव्रता आणखी वाढण्याचे संकेत आंदोलनांनी दिला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 12:51 IST

संबंधित बातम्या